Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून  प्रेम

Navra Majha Navsacha 2 Movie Review: "नवरा माझा नवसाचा 2" यंदाच्या ट्रेनच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम

नुकताच चित्रपटगृहांमध्ये आणि बॉक्स ऑफिसवर ज्याची चर्चा होत आहे तो चित्रपट म्हणजे "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाने पहिल्या दिवशीच कोटींची कमाई केली.
Published on
Review(4.5 / 5)

नुकताच चित्रपटगृहांमध्ये आणि बॉक्स ऑफिसवर ज्याची चर्चा होत आहे तो चित्रपट म्हणजे "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाने पहिल्या दिवशीच कोटींची कमाई केली तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे 1000 ते 2000 च्या वर संपूर्ण महाराष्ट्रभरात तिकिटं विकली गेली. चित्रपटाची प्रशंसा आज संपूर्ण महाराष्ट्रभरात तसेच विदेशात ही केली जात आहे. तर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळात आहे. या चित्रपटात प्रवास जरी दाखवला असला तरी त्या प्रवासात थोड्या वेळासाठी आपल्या आयुष्यात येणारे व्यक्ती कधी आपल्या आठवणींमध्ये त्यांची जागा निर्माण करतात आणि कधी आपलेसे होतात याबद्दल सांगण्यात आलेलं आहे.

चित्रपटातले कलाकार आणि पात्र:

सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा2" या चित्रपटात पहिल्या भागातील सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले हे कलाकार पाहायला मिळाले आहेत. तर यांच्या संगतीला नव्या जोषात आणि नव्या रंगसंगतीसाठी स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सिद्धार्थ जाधव, हरीश दुधाणे यांची जबरदस्त साथ पाहायला मिळत आहे. त्याचसोबत जयवंत वाडकर, विजय पाटकर, गणेश पवार, संतोष पवार आणि अली असगर हे देखील पाहायला मिळणार आहेत

चित्रपटाची कथा:

"नवरा माझा नवसाचा" या चित्रपटा प्रमाणेच "नवरा माझा नवसाचा2" हा देखील नवसासंबंधीत आहे. कथा नवसाची असली तरी त्याची पद्धत मात्र वेगळी आहे. तसेच यावेळचा नवस हा एसटीने नाही तर ट्रेन पुर्ण केलेला आहे. यावेळी ट्रेनच्या प्रवासात गणपती बाप्पा देखील पाहायला मिळत आहे. म्हणजेच यावेळी बाप्पाची सुंदर मुर्ती चित्रपटात दाखवल्या प्रमाणे सचिन पिळगावकर आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य हा अनेखाा नवस फेडण्यासाठी बाप्पाची एक गोंडस मुर्ती आपल्यासोबत प्रवासात नेतात. तसेच यावेळे ट्रेनचा प्रवास निवडण्याचे कारण म्हणजे गणपतीपुळे हे ठिकाण कोकणात येते आणि "नवरा माझा नवसाचा" या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एसटी जसा कोकणकरांचा एक भाग आहे त्याचप्रमाणे कोकणात धावणारी कोकणरेल्वे ही कोकणातील लोकांचा जिव्हाळ्याचा भाग आहे. तर हा नवस फेडताना या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मात्र संपूर्ण प्रवास हा विनोदी आणि हसत खेळत घालवलेला पाहायला मिळाला आहे.

चित्रपटाचा रिव्ह्यू:

हा चित्रपट विनोदी आणि खळखळून हसवणारा आहे. चित्रपटात एक वेगळाच प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केल्याचं पाहायला मिळालं तर या चित्रपटाला आता 4.1 एवढे रेटिंग पॉईंट्स मिळाले आहेत. या चित्रपटाची उजवी बाजू बघायची झाली तर या चित्रपटात असणारे कलाकार, या चित्रपटात पात्र जरी वेगवेगळे असले तरी या चित्रपटासाठी कलाकार म्हणून महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकारांची निवड केली आहे. त्यामुळे या चित्रपटात विनोदाची कमी भासत नाही आहे. मात्र जर डावी बाजू बघायची झाली तर या चित्रपटाला "नवरा माझा नवसाचा" या पहिल्या भागाप्रमाणे मनोरंजन करणं तितक असं जमलेलं नाही असं बहुतांश प्रेक्षकांचे मत आहे. मात्र कलाकारांचा अभिनय आणि विनोदाची जोड मिळाल्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com